शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा

By श्रीकिशन काळे | Published: July 21, 2024 4:43 PM

देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले

पुणे : मी अनेक जयपराजय पाहिले आहेत. पण जिंकल्यावर अहंकार येतो. राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले आहेत. जनतेने मोदींच्या कामावर मोहोर लावली आहे. म्हणून तर मोदी विजयी झाले. आपल्या २४० जागा आल्या.  अजून थोडी कसर राहिली आहे, आता ती भरून काढू. विधानसभेला पुन्हा भगवा फडकावू.  देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीमधील क्रीडा संकुलात रविवारी (दि.२१) पार पडले. त्यामध्ये अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सरचिटणीस विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पियूष गोयल, आशिष शेलार, अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे

साठ वर्षानंतर पहिल्यांदा एका नेत्याला तिसर्यांदा पंतप्रधानपदावर मोदींची बनले आहेत. आता विधानसभेमध्येही विजय मिळवायचा आहे. मला कार्यकर्ते भेटत आहेत. पण साशंकता आहे. विरोधकांनी इथे काही संभ्रम निर्माण केला आहे. आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे. जो विजयी होतो, त्याचेच सरकार बनते. भारतात आपले सरकार बनले आहे आणि आपण विजयी झालो आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

संविधान दिन आम्ही सुरू केला 

राहुलबाबा खटाखट वर भरोसा केला नाही. राज्य सरकार आहेत. तिथे खटाखट पैसे पाठवून द्या ना. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल बहिणींना आवाहन करतो अशी योजना मागा. आम्ही महाराष्ट्रात अनेक कामे केली. समृद्दी राजमार्ग, अटल सेतू, मेट्रो, जलयुक्त शिवार आदी कामे केली. २०१४-१९ चा कार्यकाळ हा विकासाचा होता. आम्ही गरीबांचा, आदिवासींचा विचार करतो. आंबेडकर यांचा अपमान काॅग्रेसने केला तेवढा इंग्रजांनी देखील केला नाही. आंबेडकारंना भारतरत्न नाही दिला. संविधान दिन आम्ही सुरू केला असल्याचे शहा यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस