राहुल गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नाही :अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 07:41 PM2019-02-09T19:41:14+5:302019-02-09T20:05:35+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.
पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की,काँग्रेस सरकारने १० वर्षात शेतकऱ्यांचे ५३ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. भाजपने मागील ५ वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. राहुल गांधी यांना तर बटाटा जमीनीच्या वर येतो की जमिनीमध्ये येतो, हे सुद्धा माहीत नाही.
देशाच्या स्वातंत्र्यामध्ये माझ्यासाठी काय आहे, हेच देशातील लोकांना माहीत नव्हते, मात्र मोदींनी पाच वर्षाच्या आतच देशातील ६ कोटी गरीबा घरात गॅस पोहचविण्याचे काम केले. अडीच कोटी कुटुंबाला घरे देण्याचे व वीज देण्याचे आणि ८ कोटी घरामध्ये शैचालय देण्याचे काम आम्ही केले. आणि राहुल काय कामे केली हे विचारतात. त्यांनी ५५ वर्षात थोडे जरी काम केले असते, तर मोदींवर एवढे काम करण्याची वेळ आली नसती. साडेतील महिन्यात १२ लाख लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतल्याचा दाखलाही त्यांनी दिला.