शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

मोदी जॅकेटनंतर आता राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटची फॅशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 3:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे फॅशन जगतात लोकप्रिय झालेले मोदी जॅकेट काहीसे मागे पडून सध्या राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटला  मागणी वाढल्याचे दिसत आहे. 

पुणे : राजस्थान, मध्यप्रदेश आणि  छत्तीसगडमध्ये यश मिळाल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सर्वत्र चर्चा आहे. काही काळापूर्वी विविध नावांनी हिणवले जाणाऱ्या गांधी यांची सध्या तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे फॅशन जगतात लोकप्रिय झालेले मोदी जॅकेट काहीसे मागे पडून सध्या राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटला  मागणी वाढल्याचे दिसत आहे.                 नेते किंवा सेलिब्रेटी यांचे अनुकरण करणे भारतात नवीन नाही. विशेषतः त्यांचे कपडे, हेअरस्टाईल, चष्म्याची फ्रेम यांची फॅशन सर्वसाधारणपणे रूढ होते. याचेच उदाहरण २०१४साली बघायला मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे खादी जॅकेट वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. अगदी घरगुती समारंभापासून ते कार्यालयीन कार्यक्रमांपर्यंत मोदी जॅकेट आवर्जून घातले जात होते, अजूनही घातले जात आहे. मात्र याच ट्रेंडला छेद देणारा नवीन ट्रेंड रूढ होत असून त्यात गांधी यांनी प्रचार कालखंडात वापरलेल्या लेदर जॅकेटप्रमाणे जॅकेटला तरुणांची मागणी आहे. अर्थात गांधी यांच्याप्रमाणे काँग्रेसचे राजस्थानचे नेते सचिन पायलट आणि मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधीया यांनीही प्रचारकाळात बहुतांशवेळा लेदर जॅकेट घातले आहे.

                 याबाबत फॅशन एक्सपर्ट पल्लवी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, अर्थात निवडणुकीनंतर राहुल गांधी स्टाईल हाफ लेदर जॅकेटची मागणी वाढली आहे. मुख्य म्हणजे फक्त कुडत्यांवर न घालता हे जॅकेट टी-शर्ट किंवा फॉर्मल शर्टावरही घालता येत असल्यामुळे तरुणाईची अधिक पसंती आहे. सध्या राहुल यांची ही फॅशन पुण्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फॉलो केली जात असून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेकजण लेदर जॅकेटमध्ये दिसत आहेत. त्यामुळे मोदी यांना राजकीयचं नव्हे तर सर्वच मुद्द्यांवर शह देण्याची काँग्रेसची व्यूहरचना आहे का याची चर्चा राजकीय विश्वात रंगली आहे. 

टॅग्स :PuneपुणेfashionफॅशनRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस