कवठे येमाई येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे व सहकाऱ्यांनी छापा टाकला असता जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी नीलेश पांडुरंग किठे, अर्जुन सदाशिव हिलाळ, खंडू देवराम वागदरे, सागर शांताराम पोकळे, शरद सुभाष घोडे, सावकार गोविंद भोर, राहुल बापू गाडेबैल, नानाभाऊ नथू जाधव, राहुल हिलाळ, नीलेश बोड्रे, राहुल इचके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, संजू जाधव, जगताप, पोशी, संजय साळवे, विजय जंगम यांनी केली आहे. याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. गावठी दारू तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.