पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी याबाबत पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बजरंग दगडोबा वाबळे यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिसांनी चोरीसह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, खाण आणि खनिज अधिनियम, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार हवालदार दादा ठोंबरे, वाघमोडे, जाधव, लोखंडे, पांढरे यांनी पोलीस पाटील अनिल लोणकर यांना सोबत घेत जळगाव कडेपठार येथील कऱ्हा नदीपात्रात जात छापा टाकला. तेथे वाबळे हे ट्रॅक्टरच्या साहित्याने बिगरपरवाना वाळूउपसा करत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे पाहताच ट्रॅक्टरवरील चालकाने तेथून धूम ठोकली. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २५ हजार रुपयांचा ट्रॅक्टर (एमएच-४२, एएस६३५५), एक लाख रुपये किमतीची ट्रॉली व उत्खनन केलेली सुमारे २८ हजार रुपयांची वाळू जप्त केली.
——————————————————