वडगाव मावळ – वडगाव शहरात आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांनी अवैध मटका व दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकत पोलिसांच्या साहाय्याने कारवाई केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण केले.प्रभागनिहाय दौरा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्नविशाल लॉन्स, मोरया कॉलनी, पंचमुखी चौक, केशवनगर, आंबेडकर कॉलनी, संस्कृती सोसायटी यांसारख्या भागांना भेट देत आमदार शेळके यांनी रस्ते, गटार, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांची मते जाणून घेतली. यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाला दिले. तसेच मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून विकास प्रकल्प हाती घेण्याचे निर्देश दिले.मटका व दारू अड्ड्यांवर थेट कारवाईदौर्यादरम्यान, केशवनगर येथे नागरिकांनी रेल्वे लाइनजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्याची तक्रार केली. यावेळी आमदार शेळकेंनी घटनास्थळी धडक देत मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. याशिवाय प्रभाग ४ मध्ये चालू असलेल्या दारू अड्ड्यावरही छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, या दौऱ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेळकेंनी शासकीय योजनांबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच शेळकेंनी पोलीस प्रशासनाला वाढती गुन्हेगारी आणि तरुणांमधील व्यसनाधीनतेवर आळा घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना देखील जागरूक राहण्याचे आवाहन केले.
मटका अड्ड्यावर धाड, आमदार शेळकेंची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:28 IST