पुणे : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांऐ ६ ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ५५ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. काल दि १९.७.२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत माहिती मिळाली होती. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, पुणे महापालिका कार्यालयालगत असलेल्या मंगला टाॅकीज चौक, शिवाजी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रामसर बेकरी काॅर्नर शेजारच्या अनुक्रमे स्वस्तिक लाॅटरी सेंटर, स्टार लाॅटरी सेंटर, सवेरा लाॅटरी सेंटर, साई प्रतिक लाॅटरी सेंटर, शहा लाॅटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असल्याचे समजले. त्यानंतर पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकासह जाऊन सायंकाळच्या सुमारास कारवाई केली. त्यावेळी मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे अशा एकुण ५५ जणांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, मपोउनि पंधरकर, मपोह मोहिते, मपोह शिंदे, मपोह पुकाळे, पोह कुमावत, पोना पोटे, पोशि भोसले, पोशि जमदाडे, पोना पठाण, पोना कांबळे, यांच्या पथकाने केली आहे.