चाकण - चाकण शहर व परिसरामध्ये महिला अत्याचार व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका संगीता वानखेडे (रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) हिला दि. ५ रोजी चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.सदर महिलेवर गुन्हा दाखल होऊनही कायदेशीर कारवाई होत नव्हती. सदर महिलेवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई न झाल्यास येथील खेड तालुका सकल मराठा समाज व श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलनासह चाकण पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.चाकण शहर व परिसरामध्ये संगीता वानखेडे ही महिला खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करूनखंडणी उकळण्याचे काम करीत आहे. पैसे न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी देते. या महिलेने आजपर्यंत अनेक व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांची चौकशी करण्यात यावी व सदर महिलेवर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक व उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी तिला आज अखेर अटक केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमारयादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप पुढील तपास करीत आहेत.
‘त्या’ खंडणीखोर महिलेला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:17 AM