पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ कार्यालयांवर छापे घालून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती़ आतापर्यंत ३५९ ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठी चार विशेष पथकांची स्थापना करुन डीएसकेंचे जंगली महाराज रोडवरील कार्यालय, चतु:श्रृंगी येथील घर आणि त्यांचा मुलगा शिरीष यांचे टॅम्प टॉवर येथील फ्लॅट तसेच मुंबईतील कार्यालयावर एकाचवेळी छापे घातले़ जंगली महाराज रोडवरील कार्यालयात सकाळी छापा पडल्याचे समजताच ठेवीदारांनी या ठिकाणी गर्दी केली होती़डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून ठेवीदारांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे़ १ नोव्हेंबरपर्यंत ४१ जणांनी ४ कोटी ७४ लाख ५९ हजार ६०९ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले होते़गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्षसंगम पुलाजवळील आर्थिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे़ नागरिकांना सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत येथे येऊन तक्रार देऊ शकतात. याशिवाय 020-25540077हेल्पलाईनहीसुरु करण्यात आली आहे़
डीएसकेंच्या मुंबई, पुण्यातील कार्यालयांवर छापे; गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 1:21 AM