शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे एसटी, रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:13 PM

पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस गाडी रद्द

पुणे : मुंबईत सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुणे व मुंबई दरम्यान एसटीच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण मुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तर बहुतेक गाड्या तब्बल तीन ते चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवारी सकाळपासूनच दोन्ही बाजुच्या बस विलंबाने धावत होत्या. पावसाचा जोर वाढून पाणी साठण्याचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक बस उशिरा धावत होती. दुपारनंतर वाहतुकीवर आणखी परिणाम झाल्याने काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच पावसामुळे प्रवाशांनाही पाठ फिरविली. परिणामी एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईसाठी प्रामुख्याने स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकातून बस सोडल्या जातात. शिवाजीनगर स्थानकातून दररोज १०० फेऱ्या होतात. त्यापैकी सुमारे ३० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. स्वारगेटमधील बसेसचीही जवळपास हीच स्थिती होती. मंगळवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बस विलंबाने धावल्या तर काही फेऱ्या रद्द करून आवश्यकतेनुसार बस सोडण्यात येतील, असेही एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.-------------------------इंद्रायणी एक्सप्रेस रद्दमुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ९) पुण्यातून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. इंद्रायणी एक्सप्रेस वगळता या मार्गावर धावणारी एकही गाडी रद्द करण्यात आली नाही. मात्र, पावसामुळे बहुतेक गाड्या विलंबाने धावत होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेलऐवजी दौंड-मनमाड मार्गाने वळविण्यात आली. हवामान विभागाने मुंबईत आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.-----

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊसrailwayरेल्वे