शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दत्त मंदीर पाडले; अनेक वर्षांचे पिंपळाचे झाडही काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:25 AM

साधारणपणे ३० ते ४० वर्षांपुर्वी याठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी हटविलेपुणे रेल्वे स्थानक आवारामध्ये अनेक वर्षांपुवीर्ची चार पिंपळाची मोठी झाडे

पुणे : मागील काही वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेले सुर्यमुखी दत्त मंदीर रेल्वे प्रशासनाकडून दोन दिवसांपुर्वी पाडण्यात आले. या मंदिरातील दत्त मुर्ती रिक्षा स्टॅन्डलगतच्या सबवेच्या भिंतीजवळ ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिराजवळ असलेले अनेक वर्षांचे पिंपळाचे झाडही काढण्यात आले. स्थानक परिसराच्या पुनर्विकासामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने हे मंदीर, झाड हटविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे रेल्वे स्थानक आवारामध्ये अनेक वर्षांपुवीर्ची चार पिंपळाची मोठी झाडे होती. आरक्षण केंद्रासमोर एका झाडाखाली अनेक वर्षांपासून सुर्यमुखी दत्त मंदीर होते. साधारणपणे ३० ते ४० वर्षांपुर्वी याठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली. रेल्वेतील काह कर्मचारी, रिक्षाचालकांसह अन्य काही जण या मंदीराची देखभाल करत होते. कालांतराने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास सुरू करण्यात आला. त्यासाठी काही महिन्यांपुर्वी तीन झाडे तोडण्यात आली होती. तर दोन दिवसांपुर्वी चौथे झाड आणि त्याखालील मंदीर हटविण्यात आले. या मंदिरातील मुर्ती रिक्षा स्टॅन्डजवळ ठेवण्यात आली आहे. मंदीर काढण्यासाठी त्याची देखभाल करणाऱ्या लोकांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर मंदीर हटविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचे झाड खुप मोठे असल्याने त्याचे खोड व मुळ्यांमुळे परिसरातील फरशी उखडली होती. त्याचा प्रवाशांनाही त्रास होता. त्यामुळे हे झाड काढणे आवश्यक होते. तर झाडाखालील मंदीर हटविल्याशिवाय झाड काढणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे आधी मंदीर हटवून झाड काढण्यात आले. त्यापुर्वी मंदीरातील दत्त मुर्ती रिक्षा स्टॅन्डजवळच्या भिंतीलगत ठेवण्यात आली आहे. तर झाडाचे मालधक्का येथील रेल्वेच्या जागेमध्ये पुनर्रोपण करण्यात आले. यापुर्वी काढण्यात आलेली झाडेही मालधक्का परिसरात पुनर्रोपित करण्यात आलेली आहेत. मंदीर पाडण्यापुर्वी संबंधितांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला कोणीही विरोध केला नाही. ------------मागील सहा महिन्यांपासून ही झाडे काढण्याचा प्रयत्न सुरू होता. या कालावधीत अन्यत्र मंदीर उभारून झाले असते. आताचे मंदीर पाडण्यापुर्वी तेथील मुर्ती नवीन मंदिरात विधिवत ठेवता आली असती. पण रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता केवळ मुर्ती ठेवण्यात आली आहे. - हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

........

रेल्वे स्थानकाच्या परिसराचा पुनर्विकास केला जात आहे. मंदीर व झाड असलेल्या परिसरात प्रवाशांसाठी मोठी शेड उभारली जाणार आहे. येथील झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकDatta Mandirदत्त मंदिर