पुणे : रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येणारे त्यांचे नातेवाईक, मित्रांनी रेल्वेला मागील चार वर्षात १२ कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवर चार वर्षात ९६ लाखांहून अधिक प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री झाली. त्याद्वारे सुमारे १ कोटी १३ लाख जणांनी फलाटावर ‘एंट्री’ मिळविली. त्यापैकी ८० टक्के प्रवासी एकट्या पुणे रेल्वे स्थानकावरील आहेत. रेल्वे स्थानकावरील फलाटांवर प्रवेश करायचा असल्यास एकतर प्रवासाचे तिकीट किंवा फलाट तिकीट असणे आवश्यक आहे. अन्यथा विनातिकीट प्रवासी समजून संबंधितांकडून दंड आकारला जातो. बाहेरगावी जाणारे किंवा बाहेगावाहून येणारे आपले नातेवाईक, मित्रांना भेटण्यासाठी स्थानकांवर मोठी गर्दी होते. एका प्रवाशासोबत किमान एक-दोन नातेवाईक असतातच. काही पाच-सहा जणांचे कुटूंब किंवा मित्रांचा ग्रुप येतो. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांव्यतिरिक्त त्यांचीही झुंबड उडालेली असते. त्यांच्यासह रेल्वे स्थानकांवर येऊन आश्रय घेणाºयांना आवर घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटावर प्रवेश करण्याआधी प्रवासी तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट घेणे आवश्यक आहे. यापैकी कोणतेही तिकीट नसल्यास किमान २५० रुपयांचा दंड भरावा लागतो. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, मिरज जंक्शन, कोल्हापूर सह विविध रेल्वे स्थानकांवर यावर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत १३ लाख ३८ हजार प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री झाली. एका व्यक्तीसाठी १० रुपये तिकीट दर असून एका तिकीटावर प्रत्येकी १० रुपये याप्रमाणे २-३ जणांना प्रवेश करता येऊ शकतो. त्यानुसार या कालावधीत सुमारे १५ लाख ६० हजार जणांनी फलाट वारी केली. त्यातून रेल्वेला सुमारे १ कोटी ५६ लाखांचा महसुल मिळाला. मागील तीन वर्षातही फलाट वारी करणाºयांची संख्या जवळपास तेवढीच आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंतच्या चार वर्षात एकुण १ कोटी १३ लाख जणांनी फलाट तिकीट घेतले. त्यामाध्यमातून रेल्वेने सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली.
..............
पुण्यात सात हजारांची वारीपुणे विभागामध्ये सर्वाधिक वर्दळ पुणे रेल्वे स्थानकात असते. त्यानुसार फलाट विक्रीही याच स्थानकावर सर्वाधिक होते. विभागात होणाºया एकुण फलाट तिकीट विक्रीपैकी ८० टक्के विक्री पुणे रेल्वे स्थानकावर होते. त्यापाठोपाठ मिरज जंक्शन, कोल्हापुर या स्थानकांचा समावेश होतो. पुणे स्थानकात दररोज सरासरी साडे आठ हजार जण येतात. दरम्यान, काही महिन्यांपासून फलाट तिकीटांच्या विक्रीचे काम भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळा (आयआरएसडीसी )कडे दिले आहे.--------------फलाट तिकीटातून मिळालेले उत्पन्नवर्ष तिकीट विक्री प्रवासी उत्पन्न२०१६-१७ २७,४९,५२३ ३२,२०,४६१ ३,२२,०४,६१०२०१७-१८ २८,३२,१८९ ३२,९६,९०४ ३,२९,६९,०४०२०१८-१९ २७,५२,९६७ ३२,१५,९२९ ३,७७,६१,४६०२०१९-२० १३,३७,७३८ १५,५९,७४५ १,५५,९७,४५०------------------------------------------------------एकुण ९६,७२,४१७ १,१२,९३,०३९ ११,८५,३२,५६०-----------------------------------------------------