पुणे : उन्हाळ्याच्या सुटीत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना माेठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणेरेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण १० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड्यांच्या थांबण्याचे आरक्षण, वेळेसाठी www.enquiryindianrail.gov.in या साईटला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घ्या, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अशी असेल सेवा
- पुणे-दानापूर-पुणे (२), पुणे-गोरखपूर (२), पुणे–मुझफ्फरपूर (६) अशा १० विशेष फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यात गाडी क्रमांक 01471 पुणे- दानापूर ही गाडी गुरुवारी (दि. २१) ०४:३० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४० वाजता दानापूरला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01472 दानापूर - पुणे स्पेशल एक्स्प्रेस शुक्रवारी (दि. २२) दानापूर येथून ०१:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९:४५ वाजता पुण्याला पोहोचेल.
पुणे-गोरखपूर-पुणे (२ फेऱ्या) :
- गाडी क्रमांक 01431 पुणे- गोरखपूर : विशेष गाडी शुक्रवारी (दि. २२) पुण्याहून ०४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:०० वाजता गोरखपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01432 गोरखपूर-पुणे सुपरफास्ट विशेष शनिवारी (दि. २३) गोरखपूरहून २३:२५ वाजता सुटेल आणि सोमवारी (०६:२५) पुण्याला पोहोचेल.
- पुणे–मुझफ्फरपूर–पुणे (६ फेऱ्या) : गाडी क्रमांक 05290 पुणे-मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष गाडी (दि. २५ मार्च ते ०८ एप्रिल दरम्यान) दर सोमवारी पुण्याहून (०६:३०) वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी (१५:१५) वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 05289 मुझफ्फरपूर - पुणे सुपर फास्ट एसी विशेष (दि. २३ मार्च ते ०६ एप्रिल) दरम्यान दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून २१:१५) वाजता सुटेल आणि पुण्याला सोमवारी ०५:३५) वाजता पोहोचेल.