शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

पावसाची बारा जिल्ह्यांत दडी!

By admin | Published: July 12, 2017 4:12 AM

राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून त्यात विदर्भ, खान्देशातील ९ जिल्हे तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २६ ते ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे़ याशिवाय १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून केवळ १० जिल्ह्यात सरासरीऐवढा अगर त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे़ राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान काही मोजके दिवस सोडल्यास पावसाने दडी मारली आहे़ विशेषत: विदर्भाला त्याचा अधिक फटका बसला आहे़ मराठवाड्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती काही प्रमाणात चांगली आहे़ पण, गेल्या १० दिवसांपासून तेथेही पाऊस जवळपास झालेला नाही़ विदर्भ व खानदेशातील धुळे -२८, जळगाव -२६, अमरावती -४२, नागपूर -३१, भंडारा -३५, गोंदिया -३८, अकोला -२६, चंद्रपूर -३७, गडचिरोली -२९, तर मराठवाड्यातील परभणी -२७, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली -३६ आणि कोल्हापूर -२७ टक्के कमी पाऊस झाला आहे़ राज्यातील १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ कोकणात पाऊस होत असला तरी जेवढा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे़ सिंधुदुर्ग -१५, रत्नागिरी -७, सातारा -१६, औरंगाबाद -१६, जालना -४, नांदेड -१२, यवतमाळ -१९, वर्धा -१, बुलढाणा -५, मुंबई -२९, वाशिम -१०, हिंगोली -७ आणि नंदूरबार -९ टक्के पाऊस कमी झाला आहे़ राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे सरासरीपेक्षा ७४ टक्के अधिक झाला असून नगर ३०, नाशिक ३०, पालघर ३९, ठाणे २५, पुणे २६, उस्मानाबाद ४६, रायगड ५, लातूर ९, बीड ३ टक्के जादा पाऊस झाला आहे़ राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक ठरु शकते़>तीन दिवसांत येणार पाऊसदडी मारुन बसलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ उत्तर प्रदेश, बिहार परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस पडत आहे़गेल्या २४ तासांत राज्यात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ साताऱ्यात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी झाले होते. सध्या उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे़ मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये ३५ टक्के आणि आॅगस्टमध्ये ३५ टक्के पाऊस पडत असतो़ राज्याच्या दृष्टीने गेला आठवड्यात पावसाने ताण दिला आहे़ शेतीच्या दृष्टीने तो प्रतिकुल ठरला आहे़ सरासरी पाऊस पडला तरी त्याचे वितरण महत्त्वाचे असते़ त्यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात सध्या प्रतिकुल परिस्थिती आहे़ आणखी तीन दिवसांनंतर राज्यात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे़-डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ञ