पुणे : काेराेनाचा प्रसार पुण्यात माेठ्याप्रमाणावर हाेत असताना पुणे शहराजवळील ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खानापूर व खडकवासला धरणाऱ्या साखळीत गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
अवकाळी आलेल्या पावसामुळे छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. काकडी, पालक, फुले, कोथिंबीर अशा भाज्यांचे नुकसान झाल्याने छोटे शेतकरी हतबल झाले आहेत. पुणे शहरात देखील ढगाळ वातावरण निर्मिती झाली असून वारा वाहत असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारतीविद्यापीठ भागात देखील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. दरम्यान पुढील चार दिवस राज्यात पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.