हा एक असा हंगाम आहे जिथे आपण रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट असलेली मुले पाहतो. यात काहीही शंका नाही की, हा आनंद देणारा हंगाम आहे. हा गारवा आणि पाऊस सुखद असला तरी पावसाच्या रिपरिप आणि ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे साऱ्याच प्रकारच्या जंतूंची वाढ होते. मुले पाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांमुळे ग्रस्त होऊ शकतात. ज्यामुळे त्यांना अतिसार, टायफाईड आणि हेपिटायटीस देखील होऊ शकतो आणि सध्याच्या वातावरणात दवाखान्याची पायरी चढणे म्हणजे कोरोनाची धास्ता आहेच. त्यामुळे किमान पावसाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.
- आपला परिसरातील खूप दिवसांपासून साचलेले पाणी काढून टाका.
- स्वच्छ पाण्यातसुद्धा डास अंडी घालतात. त्यामुळे साठवलेले पाणी दोन दिवसांनी वापरून बदलत रहा
- डासांपासून मुक्त होण्यासाठी मोस्क्विटो रेपेलेंट आणि डासांच्या जाळ्या वापरा.
- आपल्या मुलांसाठी रेनकोट, छत्री, पावसाळी बूट इत्यादी तयार ठेवा.
- पिण्याचे पाणी शक्यतो फिल्टर केलेले वापरा, अन्यथा उकळून गाळून थंड करूनच प्या.
- मुलांना नियमित व सातत्याने हात धुण्याची सवय लावा.
- मुलांना उबदार ठेवण्यासाठी, गरम कपड्यांचा वापर करा.
-आहार योग्य प्रकारे निवडला पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना मिळेल.
-आहारामध्ये विटामिन सी समृद्ध अन्न असावे.
- फळे, ताज्या फळांचे रस, हिरव्या पालेभाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत.
- मुलांना पुरेसे हायड्रेटेड ठेवले पाहिजे.
- रस्त्यावर उघड्यावरील अन्न टाळा.
- घरात शिजवलेल्या अन्नावर भर द्या.
- कच्च्या भाज्या खाणे टाळा, कारण त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात.
- ज्यामुळे अन्न विषबाधा (फूड पॉयझनिंग) किंवा अतिसार होऊ शकतो.
- पालकांनी त्यांच्या मुलांना चुकीच्या खाण्याच्या सवयींच्या अपायकारक दुष्परिणाम बद्दल जागरूक आणि शिक्षित केले पाहिजे.
-शरीराचे तापमान राखण्यासाठी पाण्यात भिजल्यानंतर त्यांना गरम शावर/आंघोळ घालायला लावा.
- व्हेजिटेबल सूप किंवा चहा/कॉफी सारखे काहीतरी गरम खायला द्या.
- आपल्या मुलांच्या लसीकरणाबद्दल जागरूक राहा.
- पालकांनी सक्रिय रहायला पाहिजे आणि आपल्या मुलांचे आरोग्य राखले पाहिजे.
- मुलांना इतके बळकट बनवा की त्यांना पावसाचा आनंद पूर्णपणे आणि अखंडपणे घेता येईल.
--
डॉ. स्नेहल राज्यगुरू, होमिओपॅथिक फिजिशियन अँड काउन्सलर
(बी.एच.एम.एस, पीएचडी-सोशल वर्क, पी.जी डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल काउन्सलिंग)