पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, खडकवासला साखळीतील टेमघर आणि वरसगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच नंतरच्या चोवीस तासांत टेमघरमधे २२४, वरसगाव १६७, पानशेत १६० आणि खडकवासल्याला ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. धरणसाखळीत बुधवारी पहिल्या जोरदार पावसाची नोंद झाली. खडकवासला साखळीतील टेमघर धरणात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ११९, तर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल १०५ मिलिमीटर पाऊस झाला. वरसागवला गुरुवारी सकाळ पर्यंत ७२ आणि सायंकाळी साडेपाच पर्यंत ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणाच्या दुरुस्तीकामामुळे टेमघर आणि वगरसाव धरणातील पाणीसाठा उणे होता. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे येथील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. टेमघर धरणातील पाणीसाठा ०.२७ आणि वरसगाव धरणात ०.०६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पाणलोटक्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत ७२ आणि सायंकाळी साडेपाच पर्यंत ८८, तर खडकवासला धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत २३ आणि सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत धरणात २.९९ आणि खडकवासला धरणात ०.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पावसाने हजेरी लावली. भाटघर धरणात गुरुवारी सकाळपर्यंत १२, नीरादेवघर ४४, वीर ३ आणि नाझरे धरणक्षेत्रात २ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणे धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत ६० आणि सायंकाळी साडेपाचपर्यंत २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिंपळगाव जोगे धरण परिसरात सकाळपर्यंत १३, माणिकडोह २७, येडगाव १६, वडज १७ आणि डिंभे धरणक्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस झाला. तर, दिवसभरात येथील धरणक्षेत्रात २ ते ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चासकमानला गुरुवारी सकाळपर्यंत २३ आणि सायंकाळपर्यंत ३०, पवना येथे सकाळी १०३ आणि सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पाऊस झाला. कासारसाईला सकाळपर्यंत ४१ आणि सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुळशी धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत १२८ आणि सायंकाळी साडेपाचपर्यंत ६६ मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 8:56 PM
जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. धरणसाखळीत बुधवारी पहिल्या जोरदार पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देपहिला दमदार पाऊस : खडकवासला साखळीतील उपयुक्त पाणीसाठ्यात होऊ लागली वाढपानशेत धरणात २.९९ आणि खडकवासला धरणात ०.७३ टीएमसी पाणीसाठा