पुणे : गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पूर्ण पाणी सोडण्यात आले होते; मात्र या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पावसाआभावी कोरडीच आहेत.पुण्यातील धरण परिसरात पाऊस तुरळक आहे. गेल्या महिनाभरात टेमघर वगळता अन्य धरणांमध्ये पावसाने दडी मारली आहे. जलसंपदा विभागाकडून टेमघर आणि वरसगाव या दोन्ही धरणांमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीसाठा केला जात नव्हता; परंतु धरणाची दुरुस्तीची कामे झाली असल्याने या धरणांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे.जलसंपदा विभागाने पावसाचा आढावा घेतला असून, एक जूनपासून टेमघर धरणाच्या परिसरात महिनाभरात सुमारे ५०५ मि.मी. पाऊस झाला. वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात प्रत्येकी सुमारे ३२९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात सुमारे १६१ मि.मी. पाऊस झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा वाढल्याशिवाय पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. दरम्यान, पवना, नीरा देवधर आणि उजनीच्या क्षेत्रात सरासरी ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात झाली असली, तरी वरसगाव धरण कोरडेच आहे. उपयुक्त पाणीसाठा हा अजूनही शून्य टक्के आहे. टेमघर धरणामध्ये ०.१६ टीएमसी पाणी आहे. पानशेतमध्ये सुमारे २.७४ टीएमसी पाणी असून, वरसगाव आणि पानशेत या धरणांमध्ये पाणीसाठा वाढत नसल्याने खडकवासला धरणाचीही पातळी खालावली आहे. खडकवासलामध्ये सध्या सुमारे ०.६६ टीएमसी पाणीसाठा आहे.धरणांतील पाणीसाठाभामा आसखेड २.५६पवना १.८२टेमघर ०.१६वरसगाव ०.००पानशेत २.७४खडकवासला ०.६६नीरा देवधर १.१७भाटघर २.८३वीर १.२०उजनी (- १०.४४)
जिल्ह्यातील धरणांत पाऊस पडेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:59 AM