शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

संततधार!धरणक्षेत्रात दमदार पाऊस : खडकवासला पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ९३ मिलिमीटर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:19 AM

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकऱ्यांम्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. १९) रात्री ११ वाजल्यापासून तसेच रविवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला. या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून विसर्ग करण्यात येत आहे.

पुणे : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये  चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. १९) रात्री ११ वाजल्यापासून तसेच रविवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला. या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून विसर्ग करण्यात येत आहे. पावसात सातत्य राहिल्यास आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील डिंभे आणि चासकमान या दोन धरणांतून मोठ्या पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये डिंभे धरणातून १५ हजार ५१८ क्युसेक्सने, तर चासकमान धरणातून १२ हजार ८९६ क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यांनतर भामा आसखेड ६ हजार ८०० क्युसेक्स, मुळशी ६ हजार १०० क्युसेक्स, घोड ५ हजार ४० क्युसेक्स, पवना २ हजार २०८ क्युसेक्स, आंध्रा ७२२ क्युसेक्स, कळमोड ६२८ क्युसेक्स, गुंजवणी ३०८ क्युसेक्स, कासारसाई ३०० क्युसेक्स आणि नीरा देवघर ३० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा खडकवासला (९३ मिमी) धरण क्षेत्रात झाला आहे. त्याखालोखाल येडगाव (८५मिमी), पवना (६० मिमी), कासारसाई (५० मिमी), चासकमान (४९ मिमी), वरसगाव (४९ मिमी), पानशेत (४६ मिमी), भामा आसखेड (४३ मिमी), टेमघर (४२ मिमी), आंध्रा (४१ मिमी), कळमोडी (४० मिमी), वडीवळे (४० मिमी), वडज (३२ मिमी), नाझरे (३२ मिमी), मुळशी (३१ मिमी), पिंपळगाव जोगे (२३ मिमी), माणिकडोह (१५ मिमी), गुंजवणी (१५ मिमी) आणि भाटघर (१० मिमी) पावसाची रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झाली आहे. तर उजनी, नीरा देवघर, वीर, घोड आणि विसापूर या पाच धरण क्षेत्रात अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे.पावसामुळे मुख्यत: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पात एकूण ८५.४२ टक्के म्हणजे २४.९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, तर टेमघर धरणात ४०.७० टक्के साठा झाला आहे. मात्र या धरणाची पावसाळ्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी नदीपात्रातून सोडण्यात येणार आहे. तर येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, भाटघर, नीरा देवघर आणि खडकवासला आणि वीर आदी धरणे जवळपास भरली आहेत.नीरा खोऱ्यांतील भाटघर, नीरा देवघर आणि वीर आणि गुंजवणी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक गुंजवणी १५ मिमी, तर भाटघरमध्ये १० मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील २५ धरणांपैकी १५ धरणांत ९५ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा झाला आहे. मात्र सहा धरणे अद्याप जेमतेम अर्धीच भरली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकेही कात्रीत सापडली होती.पवनेला पूरपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी भागात गेल्या २४ तासांपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून, रविवारीही पावसाचा जोर वाढलेलाच होता. त्यामुळे पवना धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले असून, ३६३६ क्युसेक पाणी नदीत सोडले आहे. पवनेला पूर आला आहे. इंद्रायणी, मुळा या नद्यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मावळातील पवना, लोणावळा, वळवण डॅम आणि कासारसाई येथील धरण भरले होते.नाझरे धरणक्षेत्रात ३२ मिमी पाऊसपावसाळा सुरू झाल्यापासून पुरंदर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र शनिवारी रात्रीपासून पुरंदर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या नाझरे धरणक्षेत्रात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.बारामती, इंदापूर, पुरंदर, दौैंडला दिलासाउर्वरित २० टक्के शेतीपिकांना उपयोगबारामती : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेल्या पावसाने बारामती शहर, तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. बागायती भागात नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाने उसपिकाला जीवदान मिळाले आहे. मात्र, जिरायती भागातील जवळपास ८० टक्के पिके जळून गेली आहेत. त्यामुळे आज आलेला पाऊस म्हणजे शेतीपिकांना उपयुक्त ठरणार नसल्याचे चित्र आहे.बाजरी, मका, पिकाला फायदाइंदापूर : शनिवारी रात्रीपासून आज (दि.२०) सायंकाळी चारपर्यंत शहर परिसरात सर्वदूर चांगला पाऊस झाला. असाच पाऊस आठ ते दहा दिवस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तो खरा ठरला तर बाजरी, मका, तूर आदि पिकांच्या वाढीसाठी फायदा होणार आहे, असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात जोरजेजुरी : पुरंदर तालुक्यात काल रात्रीपासून ११ वाजल्यापासून आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात मात्र पावसाचा जोर होता. या परिसरातील ओढे-नाले वाहत होते.पावसाचा जोर कायम राहिलाच तर किमान रब्बी हंगामाला याचा फायदा होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात वर्षभरात साधारणपणे ४५७ मिमी एवढी पावसाचीसरासरी आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजअखेर केवळ १२५ मिमी सरासरी पाऊस झाला आहे, गेल्या वर्षी आजअखेर सरासरी २४५ मिमी पाऊस झाला होता.दौंडला सलग २० तास पाऊसदौंड : दौंड शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व थरातून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सलग २० तासांच्यावर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दौंडच्या आठवडेबाजारासह व्यापारपेठेवर परिणाम झाला. शनिवारी रात्री साडेदहा नंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. रात्रभर पावसाच्या सरी कमी-जास्त प्रमाणात पडत होत्या. रात्री खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारी पूर्ववत झाला. रविवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता, तो जोर सायंकाळच्या सुमारास ओसरला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले, तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचलेले होते.दौंड तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे याचा फायदा शेतीला होईल. आठवडाभर जर असाच पाऊस अधूनमधून कायम राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील कासुरडी, भरतगाव, डाळिंब गावात टँकरची मागणी आहे.- विनायक गुळवे, ़प्रभारी गटविकास अधिकारी, दौंड