पुणे : गेले काही दिवस 40 अंशावर तापमान असलेल्या पुण्यात रविवारी पावसाच्या सरी काेसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे तापमान माेठ्याप्रमाणावर वाढले हाेते. उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले हाेते. त्यात रविवारी पडलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला. अाज दुपारी साडेचारच्या सुमारास पुण्यातील डेक्कन, एरंडवणे, पाषाण, शिवाजीनगर या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. यावेळी वाराही सुटला हाेता. विजेंच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली. लहानग्यांनी तसेच तरुणांनी या अचानक अालेल्या पावसामध्ये भिजण्याचा अानंद लुटला. तर रविवार असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी संध्याकाळी पाऊस पडेल असे वाटत नसताना संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत पुण्यात चांगलेच ऊन हाेते. त्यातच अाज पुण्यात शून्य सावली दिवस असल्याने त्याचा अनुभवही नागरिकांनी घेतला. परंतु संध्याकाळी अचानक अाभाळ भरुन अाले अाणि पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पावसामुळे मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला हाेता. चहाच्या टपऱ्यांवरही तरुणांनी गर्दी केली हाेती.
पुण्यात बरसल्या पावसाच्या सरी; नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:10 PM