श्रीगोंदा - पुणे जिल्ह्यात पावसाने रुद्ररुप धारण केले आहे भीमा घोड नद्यांना महापुर आला दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे निमगावखलु येथील नगर दौड रोडचा पुल रविवारी रात्री पाण्याखाली गेला आहे तर आर्वी बेटाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे ५०० नागरिक बेटावर आडकले आहेत पावसाची अशीच परिस्थिती राहीली तर आर्वी बेटातील नागरिकांना सुरक्षीत पणे बाहेर काढावे लागणार आहे
भीमा नदीला दौड येथे २लाख २ क्युसेक पाण्याची पातळी झाली आहे त्यामुळे नदी काठावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे निमगावखलु प्रमाणे अजनुज व इनामगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे तहसिलदार महेंद्र महाजन यांनी निमगाव खलु येथील पुलाची पाहणी केली आज सकाळी पुन्हा भीमेच्या आपले पथक घेऊन दाखल झाले आहेत
निमगाव खलु येथील पुल पाण्याखाली गेल्याने नगर दौड रोड वाहतुक काष्टी मांडवगण फराटे वळविण्यात आली आहे निमगावखलु येथे मनमाड दौड लोहमार्गावर इंग्रज कालीन पुल आहे पुराची परिस्थिती विचारात पुल पास होई पर्यंत रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे
काष्टीचा बाजारतळ पाण्याखाली
घोड धरणातून ४९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे काष्टी येथील महादेव मंदिरास पाण्याने वेढा घातला असुन भाजीपाला बाजारतळ पाण्याखाली गेला आहे
पोलिसांची सतर्कतानिमगावखलु येथील भीमा नदीच्या पुलावर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पुल पाण्याखाली जाण्यापूर्वी पोलिस बंदोबस्त लावला अनेकांना रात्रीच्या वेळी पुलावरून प्रवास करण्यास रोखले रात्री दहा वाजता पुल अचानक पाण्याखाली गेला अशा वेळी पोलिस बंदोबस्त नसता तर नक्कीच काही प्रवासाचा बळी गेला असता