पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (दि. २५) पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असून, कोकण व विदर्भात येते ५ दिवस सर्वदूर चांगला पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत पुण्यात २, लोहगाव ७, जळगाव १९, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ५८, नाशिक ९ आणि सातारा येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ ८१, अलिबाग १७, डहाणू १३ आणि भिरा येथे १७ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील परभणी येथे ७, विदर्भातील अकोला ३, अमरावती ५, गोंदिया २० आणि नागपूरला तब्बल ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.शुक्रवारी सकाळी साडेआठपूर्वीच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात पुण्यात पाषाण येथे १.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, इतर ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. नवापूरला ९०, महाबळेश्वर ७०, लोणावळा ६०, गगनबावडा ४०, कोल्हापूर, राधानगरी, शिरपूर येथे ३०, चोपडा, धडगाव, आक्री, ओझरखेड येथे २०, आजरा, अक्कलकुवा, बारामती, चाळीसगाव, धरणगाव, धुळे, एरंडोल, हरसूल, इगतपुरी, जळगाव, जत, नांदगाव, पन्हाळा, पेठ, सांगली, शाहूवाडी, शेवगाव येथे १० मिलिमीटर पाऊस झाला.मराठवाड्यातील कळंब येथे ४०, औसा, निलंगा ३०, कंधार २०, औरंगाबाद, बीड, देगलूर, लातूर, फुलंब्री, उमरगा, वाशी येथे १० मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भातील सावनेर येथे ८०, पेरसेवोनी, साकोली येथे ७०, काटोल ६०, चिखलदरा, कोपर्णा, लाखनी, सडकअर्जुनी ५०, कमळेश्वर, मूल, रामटेक येथे ४०, आरमोरी, बल्लारपूर, धारणी, गोंडपिंपरी, गोरेगाव, कुरखेडा, मूलचेरा, सिरोंचा, तुमसर येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला. आमगाव, अर्जुनी-मोरगाव, आर्वी, देवरी, देसाईगंज, हिंगणघाट, खारंधा, कोर्ची, नागपूर, नरखेड, सावली, झारीझामनी येथे २० मिलिमीटर पाऊस पडला. अहिरी, आष्टी, भामरागड, भिवपूर, बुलडाणा, चांदूरबाजार, चिखली, चिमूर, देवळी, धामणगाव, धामोरा, हिंगणा, कामठी, लाखांदूर, मोहाडी, पातूर, पौनी, राजुरा, समुद्रपूर येथे १० मिलिमीटर पाऊस झाला. कोकणातील देवगड येथे ७०, काणकोण, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, म्हापसा, माथेरान, वेंगुर्ला येथे ६०, दाभोलीम, मार्मागोवा, मुरगाव, सावंतवाडीला ५०, दापोली, हर्णे, खेड, मालवण, रत्नागिरी, वैभववाडी येथे ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.घाटमाथ्यावर पावसाच्या सरीअम्बोणे, खोपोली येथे ६०, वळवण ५०, भिरा, शिरगाव, डुंगरवाडी, ताम्हिणी येथे ४०, दावडी, कोयना ३० आणि शिरोटा येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथा परिसरात तुलनेने पावसाचे प्रमाण कमी होते.
राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 2:29 AM