पुणे : गेल्या चोवीस तासांत शहरात बरसलेल्या जोरदार सरींमुळे विविध भागात नऊ ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
शहरात गुरुवारपासून मॉन्सून पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागात झाडे आणि फांद्या पडल्याचे दिसून आले. झाडपडीमुळे वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
गणेशखिंड रस्ता, पर्वती भागातील रमणा गणपती मंदिर, सहकारमधील शिंदे हायस्कूलसमोर, प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक तीन, सेनापती बापट रस्त्यावरील पेट्रोल पंप, कोथरूड भागातील आयडियल कॉलनी, सदाशिव पेठेतील लज्जत हॉटेलसमोर, खडकीतील रॉयल सोसायटीसमोर, कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत झाडे पडल्याचे अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.