शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

बारामती नगरपालिकेची रेनवॉटर हार्वेस्टिंग चळवळ

By admin | Published: April 17, 2016 2:51 AM

पाणीटंचाईच्या झळा आता बारामती शहरातील विविध भागातील लोकांनाही बसू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विंधन विहिरी बंद पडल्या. त्यावर मात करण्यासाठी

बारामती : पाणीटंचाईच्या झळा आता बारामती शहरातील विविध भागातील लोकांनाही बसू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विंधन विहिरी बंद पडल्या. त्यावर मात करण्यासाठी बारामती नगरपालिका, एन्व्हायर्मंेटल फोरम आॅफ इंडिया व अशोकनगर सार्वजनिक मंडळाने पुढाकार घेत रेनवॉटर हार्वेस्टींगची चळवळ राबवणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली तसे शहरातील अनेक विंधनविहिरींचे पाणी वेगाने संपण्यास प्रारंभ झाला आहे. अशोकनगरमधील अपार्टमेंट, बंगल्यातून रेनवॉटर हार्वेस्टींग करण्याचा संकल्प काल झालेल्या बैठकीत करण्यात आला. बारामती नगरपालिकेचे अभियंता विजय सूर्यवंशी व वास्तुविशारद चकोर वाघोलीकर हे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही वर्षांत शहर परिसरात बेसुमार विंधनविहिरी झाल्या. चार वर्षांत पर्जन्यमान खालावल्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही कमी झाली, त्यामुळे यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टंचाईची तीव्रता कमालीची जाणवली. याबाबत सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. फोरमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सोबत ही चळवळ शहरात राबवली जाणार आहे. नगरसेविका पौर्णिमा तावरे यांनीही याबाबत पुढाकार घेत काल बैठक आयोजित केली होती. अशोकनगर परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे आपापल्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टींग करण्याबाबत अनुकूलता दर्शविली.कोट्यवधी लिटर पाणी मुरेलवर्षातील काही दिवसच बारामतीत पाऊस पडतो. या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून न जाऊ देता तो विंधन विहिरींशेजारी शास्त्रशुद्ध खड्डा घेऊन ते पाणी जमिनीत मुरविले तर उन्हाळ्यात विंधनविहिरींचे पाणी अजिबात कमी होणार नाही. एकट्या अशोकनगरच्या इमारतींवर हा प्रयोग झाला तर कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भात मुरविणे शक्य आहे, असे चकोर वाघोलीकर म्हणाले़