शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

रेनवॉटर हार्वेस्टिंग फक्त सवलतीसाठीच, सोसायट्यांचा पुढाकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:57 AM

शहरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी बचतीचे फारसे महत्त्व नसल्याने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे पुणेकरांकडून दुर्लक्षच केले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे  - शहरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी बचतीचे फारसे महत्त्व नसल्याने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे पुणेकरांकडून दुर्लक्षच केले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरामध्ये तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत मिळकती असून, यापैकी केवळ १० हजार ४८५ सोसायट्यांमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प सुरू असल्याची अधिकृत माहिती महापालिकेकडून देण्यात आली. यामध्येही मिळकतकरातील सवलतीसाठी प्रकल्प उभारले असले तरी प्रत्यक्षात ते चालू नसल्याचेही दिसून आले आहे.राज्यातील अन्य सर्व शहरांपेक्षा पुणेकरांना प्रतिमाणसी प्रतिलिटर सर्वाधिक पाणी मिळते. शहराच्या उशाला चार-चार धरणे असल्याने व पाणीबचतीचे फारसे गांभीर्य नसल्याने पुणेकर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. परंतु शहराची लोकसंख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे खडकवासला प्रकल्पातील मंजूर पाणीसाठा कमी पडत असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यात गेल्या काही वर्षांत राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या, पाणीटंचाईच्या झळा पुणेकरांनादेखील सहन कराव्या लागल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईमुळे पुणेकरांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने शहरात २००५ पूर्वीच्या सहकारी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा सुरू करणाऱ्या सोसायट्यांना अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. पाणी बचतीचे प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला तरी शहरातील सोसायट्यांनी अद्यापही फारसा पुढाकार मात्र घेतलेला नाही.सन २००५ नंतर शहरात उभा राहणाºया सर्व प्रकल्पांंमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु त्यानंतरदेखील शहरातील अनेक नवीन प्रकल्पांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरामध्ये दरवर्षी किमान सरासरीएवढा पाऊस होत असताना केवळ पाणीबचत, साठवण न केल्याने पावसाचे लाखो लिटर पाणी वाहून जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत दर उन्हाळ्यामध्ये शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक सोसायट्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. एप्रिल-मे किमान दोन महिने पाण्याच्या टँकरसाठी सोसायट्यांकडून लाखो रुपये खर्च केला जातो. परंतु रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याकडे सोसायट्यांकडून दुर्लक्ष केले जाते.आधी केले नंतर सांगितले, या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मुख्य इमारतीसह शहरातील नाट्यगृहे, सरकारी रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय व काही शाळांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा सध्या उपलब्ध आहे. अद्याप काही इमारतींमध्ये ही सुविधा नसून, येत्या काही महिन्यांत शंभर टक्के सरकारी इमारतींमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- शिवाजी लंके,महापालिका भवन विभागप्रमुख2005सन २००५ नंतर शहरात उभ्या राहणाºया सर्व प्रकल्पांंमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सुविधा करणे कायद्याने बंधनकारक आहे.पुण्याचे केपटाऊन होण्यास वेळ लागणार नाहीपुणे शहरातील नद्यांचे पाणी प्रदूषणामुळे वापरण्यास योग्य नाही. शहरामध्ये १५ हजारांपेक्षा अधिक बोअरवेल घेऊन भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने कमी करत आहोत. शहरात सरासरी पाऊस पडतो. परंतु पावसाचे हे पाणी साठविण्यासाठी किंवा भूगर्भामध्ये जिरविण्यासाठी कोणतेही प्रयत्न पुणेकरांकडून होत नाहीत. यामुळे येत्या काही वर्षांत पुण्याचे केपटाऊन होण्यास वेळ लागणार नाही. शहरात २००२ पासून ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’च्या जनजागृतीचे काम करत आहोत; पण पुणेकरांकडून अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळत नाही. शासनाने बंधनकारक करून, महापालिकांकडून करात सूट देऊन, अनुदान देऊनदेखील पुणेकरांना पाण्याचे महत्त्व कळत नाही, ही खेदाची बाब आहे. याउलट बीडसारख्या मागासलेल्या भागातील लोक स्वत: खर्च करून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतात, हे विशेष.- कर्नल शशिकांत दळवी, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांचे अभ्यासक 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी