लाखेवाडी : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो, असे मत कृषिकन्या काजल हाके हिने व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी ती पुढे म्हणाली, पावसाचे पाणी गोठ्यातील शेण, मूलमूत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडण्याची भीती असते. त्याचा थेट परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यासाठी गुरांच्या गोठ्याची स्वच्छता अत्यावशयक असते. तसेच गुरांची देखील स्वच्छता आवश्यक असते. गोठ्याची स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे. तसेच निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कृषिकन्या काजल हिने केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, विषय शिक्षक प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी रेडणी गावातील शेतकरी पोपट हाके,सर्जेराव काळे, खंडेराव काळे,विवेक हाके,रोहन काळे आदी शेतकरी उपस्थित होते.
———————————————