जेजुरी : गुंजवणी धरणातील पुरंदर तालुक्यासाठी राखीव असलेले २.०२ टीएमसी पाणी तालुक्यात आणण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रामुख्याने प्रस्ताव ठेवणार आहे. पुरंदरमधील रायता प्रकल्प पूर्ण करणे, त्याचबरोबर युवकांना रोजगारासाठी मंजूर असलेली विस्तारित एमआयडीसी उभारणे, दुष्काळी तालुक्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, राज्यातील सिंचन अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून कालवे काढणे, पाण्याचे समन्यायी वाटप करणे.कांदा, दूध दरवाढ करणे, भारनियमन कमी करून पिकांना पाणी वेळेत मिळावे यांसाठी धरणातील पाण्याचे नियोजनबद्ध आवर्तन सोडणे, तसेच तरुणांच्या हातांना रोजगार अशा प्रमुख प्रश्नांवर पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार आहेत. कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवणार याबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यातील प्रमुख आमदारांशी केलेली बातचीत.
कांदा, दूध, भारनियमनावर आवाज उठवणार
By admin | Published: December 08, 2014 12:16 AM