शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

पुण्यात रुजतंय 'बुलेटराज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:42 PM

पुण्यात बुलेट चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात तब्बल 14 हजार 800 बुलेटची नाेंदणी आरटीअाेकडे करण्यात आली अाहे.

ठळक मुद्देपुणेकरांमध्ये वाढतीये बुलेटची क्रेझवर्षभरात 14 हजाराहून अधिक पुणेकरांनी केली बुलेटची खरेदी

पुणे : 'धकधक' अावाज करत ती जवळून गेली की सगळ्यांचा लक्ष तिच्याकडे असते. तिच्यासाेबत असताना प्रत्येकजण अापण काेणीतरी विशेष अाहाेत याचा 'फिल' घेत असताे. ती ज्याच्याकडे असते त्याची समाजात शान असते. तीची स्टाईलच झकास असते, अशी 'ती' म्हणजेच 'बुलेट' दुचाकी. पुण्यात या बुलेटच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्याच्या परंपरेमध्ये अाता बुलेटनेही अापले स्थान पक्के केले अाहे. पुण्याच्या रस्त्यांवर सध्या या बुलेटचे 'राज' दिसत अाहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून(अारटीअाे) मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एप्रिल 2017 ते मार्च 2018 मध्ये 14,800 नव्या बुलेटची नाेंदणी झाली अाहे.     पुण्याला दुचाकींचे शहर अशी अाेळख अाहे. अाशिया खंडात सर्वाधिक दुचाकी या पुण्यात आहेत. पुणेकरांच जितकं त्यांच्या संस्कृतीवर प्रेम अाहे तितकंच प्रेम हे त्यांच्या दुचाकीवर अाहे. गेल्या काही वर्षात पुण्यात बुलेटची संख्या लक्षणीय वाढत असून नवीन 'बुलेट' नावाचं कल्चर रुजू लागलं अाहे. साधारण 350 सीसीचे इंजिन या बुलेटला असते. दिसायलाही ती भारदस्त असल्याने तरुणांचा तिच्याकडे अाेढा अधिक अाहे. सर्वात महत्त्वाचं तिचा अावाज. रस्त्यावरुन 'धकधक' अावाज अाला की समाजायचं की बुलेट चालली अाहे. अाधी चित्रपटांमध्ये गावचा पाटील, गावातील माेठं प्रस्थ यांच्याकडे बुलेट असल्याचे दाखविले जात असे. अाता पुण्यातील तरुण या बुलेटकडे अाकर्षित हाेत अाहेत. बुलेट चालविताना अापण काेणीतरी विशेष अाहाेत असाच काहीचा फिल तरुण घेतायेत. सैराटमध्ये अर्चिला बुलेट चालविताना दाखविल्यानंतर तरुणींमध्येही या बुलेटची क्रेझ पाहायला मिळत अाहे. पुर्वी एकाच पद्धतीची बुलेट मिळत असे. सध्या विविध प्रकारच्या बुलेट बाजारात दाखल झाल्या अाहेत.     आयटी क्षेत्रात काम करणारे बलविंदर सिंग म्हणाले, बुलेट चालविण्याची फिलिंगच 'लय भारी' अाहे. बुलेट चालवत असताना अापण या रस्त्यावर काेणीतरी विशेष अाहाेत असे वाटते. तसेच बुलेटचा अावाज ही तीची एक वेगळीच अाेळख अाहे. माेठ्या क्षमतेचं इंजिन असल्यामुळे लाॅंग-ड्राईव्हला घेऊन जाता येते. बुलेटवरील प्रवासामुळे पाठदुखी सुद्धा हाेत नाही. अद्वैत साताळकर म्हणाले, पहिल्यापासूनच मला बुलेट खूप अावडते. बुलेटबद्दल मला नेहमीच अाकर्षण हाेतं. आम्ही सहा-सात मित्रांनी ठरवून साेबतच बुलेट घेतली. बुलेटवरुन फिरण्याची मजाच निराळी असते. मित्रांसाेबत बुलेटवरुन भटकताना भन्नाट मजा येते. अाम्ही गाेवा, महाबळेश्वर बुलेटवर पालथे घातले अाहेत. निखिल जाधव म्हणाला, अापल्याकडे बुलेट असणं ही एक शान असते. बुलेटवर प्रवास करताना रुबाबदार वाटतं. अाम्ही मित्र अनेकदा बुलेटवरुन लांब फिरायला जात असताे. बुलेट ही अापण माेठं प्रस्थ असल्याचा अनुभव देत असते. 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरcultureसांस्कृतिक