पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.जागतिक मराठी अकादमीतर्फे अ १५वे 'शोध मराठी मनाचा-२०१८' जागतिक संमेलन, पुण्यात १ ते ३ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. यामध्ये ३ जानेवारी रोजी राज ठाकरे शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. हा दोन पिढ्यांचा संवाद असून एका बाजूला पन्नास वर्षांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कर्तृत्ववान कारकीर्द तर दुसरीकडे महाराष्ट्र व मराठीचे प्रश्नांकित भवितव्य आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा सर्व महाराष्ट्राला लाभ व्हावा व मार्गदर्शन मिळावे, हा उद्देश या मुलाखतीमागे असल्याचे फुटाणे यांनी सांगितले. या संमेलनात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परदेशातील विविध कर्तृत्ववान मराठी माणसांच्या मुलाखतीही होणार आहेत. या संमेलनाची तीन दिवसांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका २० डिसेंबर २०१७ रोजी जाहीर करण्यात येईल, असे फुटाणे यांनी सांगितले.
राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 6:16 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे.
ठळक मुद्देज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली माहितीतीन दिवसांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका २० डिसेंबर २०१७ रोजी करण्यात येईल जाहीर