राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 04:51 PM2022-04-03T16:51:41+5:302022-04-03T17:05:48+5:30

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला

Raj Thackeray just turns around and changes said Ajit Pawar beating | राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

googlenewsNext

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडूनही राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी विधानसभा वेळी काय केलं तुम्ही पहिल अन् कालच भाषण ऐकलं त्यामुळं त्यांचं सरड्यासारख रंग बदलण्याचे काम सुरू असलायची टीका पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले,  नुसते भाषणे करून रोजी रोटीचा अन जनतेचा प्रश्न सुटत नाही. ते नुसती पलटी मारतात लोकसभा निवडणूका वेळी केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली होती. परत विधानसभा वेळी काय केलं तुम्ही पाहिलं अन कालच भाषण ऐकलं त्यामुळं सरड्यासारख रंग बदलण्याचे काम राज ठाकरेच सुरू आहे. राज ठाकरे यांना टीका अन् नकलाशिवाय काही जमत का? अजित पवारांचा सवाल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. 

आमदार आपल्याला सोडून का गेले हे पाहावे 

राज ठाकरे यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी १४ आमदार आपले आले होते. ते आपल्याला सोडून का गेले? त्याची विश्वासार्हता राहिली नाही. एकेकाळी नाशिक, पुण्यात अनेक नगरसेवक आमदार होते, त्यांना कितीजण सोडून गेले ते त्यांनी पाहायला हवे. 

नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का?

राज ठाकरे नुसती पवार साहेबांवर टीका करतात, एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कौतुक केलं अन आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत. आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. याचं जन्म नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिल जात. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

Web Title: Raj Thackeray just turns around and changes said Ajit Pawar beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.