शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

राज ठाकरेंचं नाव येताच वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 3:11 PM

वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यासाठी कुणी प्रयत्न केले?

पुणे : गुढीपाढव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या (raj thackeray) भाषणातील काही मद्द्यावरून पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे (vasant more) यांनी नाराजी दर्शवली होती. पुण्यातही अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या विधानावरून निदर्शने झाली. त्यानंतर पुणेमनसेमध्ये मोठ्या हालचाली होऊन वसंत मोरेंचे शहराध्यक्षपक्ष काढून साईनाथ बाबर यांच्याकडे ते पद देण्यात आले. 'पक्ष म्हणून मी राज ठाकरेंच्या सोबत आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे विधानाचे समर्थन करणार नाही', असंही मोरे म्हणाले होते. त्यानंतर लगेच मोरेंना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.

पुणे शहरात मनसेच्या पक्षवाढीसाठी वसंत मोरे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच ते पुण्यातील प्रसिद्ध नगरसेेवक आहेत. कोरोनाच्या काळात मोरे यांचे काम कौतुकास्पद ठरले होते. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही तसेच मेसेजला रिप्लायही केला नाही. गेली दोन दशकांपेक्षा राज ठाकरेंसोबत मी असूनही अशी वागणूक मला पक्षात मिळत आहे, असं म्हणत वसंत मोरे यांच्या अश्रूचा बांध फुटला. मोरेंवरील कारवाईनंतर इतर पक्षांतून त्यांना ऑफर येत आहेत. 

'माझ्या राजीनाम्यानंतर पक्षकार्यालयात जल्लोष...'

याच मुद्द्यावर लोकमतच्या प्रतिनिधीसोबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, सत्तावीस वर्ष राज साहेबांसोबत होतो. साई आणि वसंत मोरे हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. त्याच्याबद्दल मला काहीच अडचण नव्हती. पण वसंत मोरेचे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला तो मला खटकला. माझे पद गेल्यानंतर फटाका का वाजल्या, गुलाल उधळला गेला. आजपर्यंत मी कोणतीच गोष्ट पक्षाच्या विरोधात केली नव्हती. ज्या कार्यकर्त्यांनी माझे पद गेल्यानंतर जल्लोष केला ती बाब माझ्या मनाला लागल्याची भावना मोरे यांनी व्यक्त केली.

वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यासाठी कुणी प्रयत्न केले?यावर बोलताना मोरे म्हणाले, त्या सर्व झारीतल्या शुक्राचार्यांची नावे मी राज ठाकरे यांना सांगितली आहेत. या लोकांवरती कारवाई न करता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर करणे योग्य आहे का? कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की एका हिंदू नेत्यासाठी मुस्लीम लोक रस्त्यावर आले होते.

राज ठाकरेंचे बोलणे झाले का?या प्रश्नावर बोलताना मोरे म्हणाले, मी साहेबांना काल मेसेज केला होता पण त्याला अजून रिप्लाय आला नाही. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. सत्तावीस वर्ष मी साहेबांसोबत होतो, पण आता मलाच काही कळत नाही करावं...' हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा