पुणे: गुढीपाढव्यादिवशी झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns raj thackeray) यांचे भाषण आणि त्यातील काही मुद्द्यावरून राज्यभरात मोठे पडसाद उमटले. त्यादिवशी भाषणादरम्यान राज यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होते. त्यानंतर या वक्तव्याने राज्यभरातून समिश्र प्रतिक्रिया आल्या.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. तसेच पुण्यात मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही आपल्याला वॉर्डमध्ये शांतता राखायची आहे असं वक्तव्या केले होते. त्यामुळे राज यांच्या या वक्तव्यावरुन मनसेमध्येच दुमत असल्याचं चित्र दिसत आहे
मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातील वक्तव्यामुळे आता पुण्यातील कोंढावा येथे राज ठाकरे यांनी उद्धाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचं नाव काढून टाकण्यात आले आहे. कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमधील सुविधांचे लोकार्पण २०१३ साली ठाकरेंच्या हस्ते झाले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजी पसरली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नाव खोडले आहे. याचा व्हिडिओही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.