राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजगड पायथ्याजवळ संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजेंद्र बांदल यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात राजेंद्र बांदल यांनी मुळशी तालुक्यामध्ये गोरगरीब व गरजू कुटुंबीयांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला होता. याचबरोबर आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना शिजविलेल्या अन्नाचे देखील वाटप केले होते. तसेच हिमालय सहकारी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नवं-नवीन उद्योजकही घडविले, तसेच त्यांना उद्योग करण्यास प्रोत्साहन दिले होते. या सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची नोंद घेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी बांदल यांना हा पुरस्कार दिला. यावेळी वेल्हाचे तहसीलदार शिवाजी शिंदे,जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे,गटविकास अधिकारी शिंदे, राहुल पोकळे,नितीन बोके,सचिन शिंदे, संजय दुधाणे, विनोद माझीरे आदी उपस्थित होते.
१४ पिरंगुट
राजगड येथे मावळाभूषण पुरस्कार स्वीकारताना राजेन्द्र बांदल, समवेत दत्ताजी नलावडे व इतर.