अकरा सदस्य असलेल्या पिंपरखेड ग्रामपंचायतीची सदस्य निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र सरपंचपदी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
माजी सरपंच राजेंद्र दाभाडे यांच्या काळात गावात मोठ्याप्रमाणात विकास कामे झाली होती. त्यामुळे तरुणांनी दाभाडे यांची निवड व्हावी म्हणून जोरदार तयारी केली. सरपंच पदासाठी मतदान झाले त्यामध्ये दाभाडे यांना सहा तर नीलम वरे यांना पाच मते मिळाली. उपसरपंच पदासाठी विकास वरे यांना सहा, तर विरोधी युवराज गावशेते यांना पाच मते मिळाली.
सरपंच राजेंद्र दाभाडे म्हणाले की, राज्यांचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या माध्यमातून गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मार्गी लावण्यात येईल. गावातील जनतेने बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले असून पुन्हा सरपंच केल्याने जबाबदारी वाढली आहे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते सरपंच राजेंद्र दाभाडे व उपसरपंच विकास वरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी सरपंच दामू दाभाडे, नानाभाऊ गावशेते व सदस्य उपस्थित होते.
फोटो : पिंपरखेड गावच्या सरपंच राजेंद्र दाभाडे व उपसरपंच विकास वरे व कार्यकर्ते सत्कार करताना.