नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र मेहेर व उपसरपंचपदी माया डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. बी . मोरे यांनी दिली.
दरम्यान, विरोधी गटात ७ सदस्य असताना या गटाने निवडणुकीत अर्ज दाखल न करता निवडणूक बिनविरोध पार पाडल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सरपंच पदासाठी राजेंद्र मेहेर यांचा, तर उपसरपंच पदासाठी माया डोंगरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जंगल कोल्हे, प्रकाश भालेकर, किरण आल्हाट, राजश्री काळे, शुभांगी कानडे, स्नेहल कांकरीया, ज्योती संते, संगीता काळे आदी सदस्यांसह गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख संजयशेठ वारूळे, जालिंदर कोल्हे, विपुल फुलसुंदर, शिवदत्त संते, सचिन वारूळे, ईश्वर अडसरे, शांताराम पारधी, दत्तात्रय काळे यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर श्री भागेश्वर पॅनेलचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य आत्माराम संते, देवेंद्र बनकर, विनायक भुजबळ, रेखा फुलसुंदर व इतर सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार केला.
--
फोटो : ०९नारायणगाव सरपंचपदी
फोटो - नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करताना गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख संजय वारूळे, जालिंदर कोल्हे, जंगल कोल्हे, विपुल फुलसुंदर आदी