भाविक आणि प्रवाशांच्या मागणीनुसार या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला असून राजगुरुनगर एसटी बसस्थानकावरून दररोज सकाळी दहा वाजता ही बस अक्कलकोटकडे स्वारगेट (पुणे), इंदापूर, सोलापूर यामार्गे मार्गस्थ होणार आहे. अक्कलकोट येथे मुक्कामी ही बस पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता राजगुरुनगरसाठी याच मार्गाने परत येणार आहे. यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. यावेळी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे साधक निलाकांत देसले, गणेश राक्षे, मेघा बारमुख यांसह वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक महेश विटे, चालक राजेश कांबळे, वाहक अनिल गोसावी, गौरव काळे, दत्तात्रय गभाले, दिलीप चौधरी, अमित जगताप, नागेश्वर वैरागर, कालीदास चिखले, बाबाजी गाढवे, हिरामण दिघे, गुलाब तिटकारे, कमलाकर रत्नपारखी, कांताराम गभाले आदी उपस्थित होते.
लवकरच कोल्हापूर आणि तुळजापूर, गाणगापूर या राजगुरुनगर येथून तीर्थक्षेत्री जाणाऱ्या बससेवांचा प्रारंभ करणार असल्याचे आगार व्यवस्थापक थोरात यांनी सांगितले.
२४ राजगुरुनगर बस
बससेवेचा प्रारंभ करताना आगारव्यवस्थापक शिवकन्या थोरात व इतर.