या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी खेड तालुक्याचे आमदार दिलिप मोहीते पाटील, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पोलिस ठाण्याचे निरिक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलिश निरिक्षक राहुल लाड, भारत भोसले, गोपीनिय विभागाचे संदिप भापकर व कान्हेवाडी येथील शंकर मठाचे १०८ यती परमेश्वर महाराज, ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे, बजरंग दलाचे गोरक्षा प्रमुख गणेश रौधळ, मंचर शहर संयोजक अक्षय जगदाळे, सह्यादी प्रतिष्ठानचे बाबासाहेब दिघे, हुतात्मा राजगुरू फाऊंडेशनचे अमर टाटिया, रोटरी क्लब चे अध्यक्ष अजित वाळुंज, अविनाश कोहिणकर, अविनाश कहाणे, गणेश घुमटकर हे उपस्थित राहणार आहेत. हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाचे मयूर सावंत, अक्षय पर्हाड, राजेश लांडे, अवधूत चौधरी, दीपक गावडे, निकेत आरबुज, दत्ता पोखरकर, योगीराज करवंदे, कृष्णा कुलकर्णी, मयूर भगत,चेतन हाडके, मोहनदास गावडे हे विशेष प्रयत्न करत आहेत. या रक्तदान शिबिरासाठी पुणे ब्लड बँक त्यांच्या स्टाफ सहित उपस्थित राहणार आहे. सध्या महाराष्ट्र भरात रक्ताचा मोठा तुटवडा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या शिबिरासाठी घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्व रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे, राजेंद्र मांजरे यांनी केले आहे.
राजगुरूनगर एस. टी स्टँड येथे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:09 AM