सन २०१२ पासून ही रक्कम कमी-अधिक स्वरूपात थकीत आहे. त्यात वाढ होत गेली. राज्य सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हे बिल सवलतच्या स्वरूपात कमी करण्यासाठी नगरपरिषेदेचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. २२) सकाळी सुरू करण्यात आला. तथापि पूर्ण बिल भरणा होईपर्यंत पथदिवे वीजपुरवठा खंडित राहणार आहे आहे, असे महावितरण कंपनीचे सहायक अभियंता अविनाश सावंत यांनी सांगितले. थकीत वीजबिलामुळे राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाणी योजना आणि स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा कंपनीने सोमवारी (दि. २१) खंडित केला होता. रस्त्यावर अंधार राहून नळाला पाणी येणार नाही. नागरिकांचा रोष वाढू नये म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष गरुड, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे,नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय यांनी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार थकीतपैकी पाणी योजनेचे ४० लाख व स्ट्रीट लाईटचे २२ लाख असे मिळुन ६२ लाख रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीला देण्यात आला. स्ट्रीट लाईटचे पूर्ण थकीतबिल आठ दिवसांत भरण्यात यावे तोपर्यंत पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीजबिल आठ दिवसांत न भरल्यास वीज खंडित करण्यात येणार आहे, असे अविनाश सावंत यांनी सांगितले.
वीज मंडळ अधिकाऱ्यांना थकीत बिलापैकी ६२ लाख रुपयांचा धनादेश देताना मुख्याधिकारी प्रकाश पाटील, शिवाजी मांदळे व इतर.