दावडी : नोटाबंदीमुळे शेतमाल मातीमोल होण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी व कामगार वर्ग या नोटाबंदी निर्णयाने हतबल झाला आहे. शेतकरी व कामगार वर्ग यांना धीर देण्यासाठी व नोटाटंचाई दूर करण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यात आला. सुमारे अर्धा तास महामार्गावर आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नोटाबंदी व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या समस्यांसाठी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी कृषी उप्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, खेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास सांडभोर, पंचायत समिती सभापती सुरेश शिंदे, बापूसाहेब थिगळे, शैलेश मोहिते, सुरेखाताई मोहिते, कैलास लिंभोरे, विलास कातोरे, अरुण चांभारे, साळूबाई मांजरे, शांताराम सोनवणे, अशोक राक्षे, सुनील थिगळे, संध्या जाधव, लक्ष्मण टोपे, अरुण थिगळे, कांचन ढमाले, निर्मला पानसरे, हेमलता टाकळकर, बिजलीताई भालेकर, अर्चना किर्लोस्कर धैर्यशील पानसरे, विलास मांजरे उपस्थित होते.
राजगुरुनगरला वाहतूककोंडी
By admin | Published: January 10, 2017 2:25 AM