शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

राजगुरुनगरकरांची शौैचालयाच्या दुर्गंधीतून होणार मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:15 AM

राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राजगुरुनगर : राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीजबचत तसेच पाणीबचतही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती चौक, दिलावर खान दर्गा, गढई मैदान बाजार, नगर परिषद बाजारतळ, स्मशानभूमी, पाबळ रोड, तिन्हेवाडी रोड, मासे बाजार आदी ठिकाणी ‘दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे’ ठेवण्यात येणार आहेत.राजगुरुनगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. गावाची लोकसंख्या आणि आकारमान तर वाढलेच; त्याचबरोबर दळणवळणही खूप वाढले आहे. त्याप्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या वाढली नाहीच. उलट, आधी काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे लोकांनी पाडून टाकली आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे नाहीत. जी काही उरली आहेत तेथे लोकांनी नळ तोडून, भांडी तोडून, दगडगोटे टाकून त्यांची दुरवस्था केली आहे. त्यामुळे तिथे खूप दुर्गंधी असते. या परिस्थितीमुळे लोकांची फार अडचण होते.राजगुरुनगर शहरातील ही समस्या ओळखून नगर परिषदेने पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यातील एका कंपनीने बनविलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे ठिकठिकाणी बसविण्याचा विचार नगरसेवकांपुढे ठेवला. सर्वांनी त्याला मान्यता दिली.>स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आल्याने स्वतंत्र वीजचे गरज नाहीमुतारीची भांडी नवीन ‘जेलयुक्त’ तंत्रज्ञान वापरून बनविली आहेत. त्यामुळे पाणी वापरण्याची गरज राहत नाही, तसेच दुर्गंधी राहत नाही. हे विशिष्ट ‘जेल’ तीन-चार महिन्यांनी पुन्हा भरता येते.या स्वच्छतागृहाच्या भिंती उष्णतारोधक पदार्थाने बनविलेल्या असल्यामुळे पत्रा किंवा ‘फायबर’ भिंतींसारख्या असल्याने तापत नाहीत. शिवाय, या भिंती मजबूत असल्याने सहजासहजी तोडता येत नाहीत.या स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आले आहेत; त्यामुळे त्या संचाला विजेची गरज नाही. शौचालयात स्टीलची भांडी वापरण्यात आल्याने ती सुलभतेने स्वच्छ करता येतात.या संचांमध्ये मुळातच पाईपला जोडलेले नळ बसविण्यात आल्याने ते चोरट्यांना खोलूननेता येत नाहीत. संचाचातळ अल्युमिनियमचा, तसेच आतील बाजू मार्बलसारख्या डिझाईनची आहे.