शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय विविध उपाययोजनांसह सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 8:21 PM

देशभरातील प्राणी संग्रहालयासाठी हायअलर्ट ..

ठळक मुद्देप्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना.

पांडुरंग मरगजे - पुणे : मानवाकडून मानवाला होणाऱ्या संसगार्मुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाच नुकतेच अमेरिकेत वाघिणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे आता प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून खबरदारी म्हणून बाहेरून प्राण्यांसाठी खाद्य घेऊन येणाऱ्या वाहनांचे निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे, प्राण्यांची विशेष काळजी घेताना स्वच्छता राखण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करून घेण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. पुणे शहरात उन्हाची तीव्रता वाढली असून प्राणी उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग प्राण्यांनाही होत असल्याचा प्रकार समोर आल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनावर दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. एकीकडे उन्हाच्या तीव्रतेपासून प्राण्यांचा बचाव करणे तर दुसरीकडे प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे. 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये महिन्यापूर्वीच दाखल झालेल्या पवन या सिंहाबरोबरच हत्ती, बिबट्या, अस्वल, हरण, साळिंदर, सांबर, निलगाय, वेगवेगळ्या प्रजातीचे पशू पक्षी, साप अशा ६७ प्रकारचे ४०० प्राणी आहेत.देशभरातील प्राणी संग्रहालयाबरोबरच राजीव गांधी प्राणी संग्रहालय सध्या बंद आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांना खाद्य देताना स्वच्छता राखणे, सफाईसाठी येणाऱ्या  कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क वापरून तसेच विशेष संरक्षक घालून सोशल डिस्टंसिंग पालन करत काम करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राजकुमार जाधव म्हणाले मानवाकडून प्राण्यांना संसर्ग होण्याची शक्यता समोर आल्याने आमच्या चिंता वाढल्या आहेत. या अनुषंगाने प्राण्यांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने सुरक्षा उपकरणांविना प्राण्यांचा जवळ जाऊ नये, त्यांच्याशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

............................ अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्राँक्स या प्रसिद्ध प्राणी संग्रहालयात नादिया या चार वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याची जगातील पहिलीच घटना समोर आली. या संग्रहालयातील प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता त्याच्यापासून या वाघिणीला लागण झाली असल्याचे मत वैद्यकीय आधिकाऱ्यांनी व्यक्त केले त्यामुळे प्राणी संग्रालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आगामी काळात प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील हे पाहावे लागणार आह

टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका