मार्गासनी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वेल्हे तालुका निवड चाचणीमध्ये विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुलांतील मल्लांनी बाजी मारली आहे. माती व गादी या दोन्ही विभागात येथील मल्लांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांनी विजयी मल्लांचे अभिनंदन केले आहे.
वेल्हे तालुका निवड चाचणी स्पर्धा विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुलात नुकतीच पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्ष पोपट नलावडे, उपाध्यक्ष कैलास
शेंडकर, वस्ताद नंदू लिम्हण, नवनाथ शिर्के, विंझरचे सरपंच विनायक लिम्हण, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, अंकुश दसवडकर, काळुराम जगताप, माजी उपसरपंच सतीश लिम्हण वस्ताद राजाभाऊ लिम्हण, प्रमोद शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविलेले मल्ल पुढीलप्रमाणे
गादी विभाग ---
५७ किलो गटात अक्षय श्रीरंग भोसले
६१ किलो गटात मयूर सुरेश दारवटकर
६५ किलो गटात शुभम सुरेश शिंदे
७० किलो गटात अक्षय मधुकर नलावडे
७४ किलो गटात मयूर नंदू लिम्हण
८६ किलो गटात रितेश रोहिदास धरपाळे
९२ किलो गटात प्रतीक विकास नलावडे
माती विभाग
५७ किलो गटात अमित संतोष महाडिक
६१ किलो गटात प्रथमेश लहू देवगिरीकर
६५ किलो गटात स्वप्निल अंकुश चोरघे
७० किलो गटात विजय विठ्ठल राजीवडे
७४ किलो गटात शुभम सुनील राऊत
७९ किलो गटात करण तुकाराम शेडगे
८६ किलो गटात अतुल सीताराम पानसरे
९२ किलो गटात विशाल शिवाजी भोसले
महाराष्ट्र केसरी खुला गटात प्रदीप गुलाब शिंदे
या कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून तुषार गोळे, विजय शेंडकर, संतोष तोडकर यांनी काम पाहिले.
राजतोरण कुस्ती संकुल विंझर (ता. वेल्हे) माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, अध्यक्ष पोपट नलावडे व इतर प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मल्लासोबत.