शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राजू शेट्टी यांच्याकडून आचारसंहितेचा भंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 12:54 AM

राजू शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यातील हेरले या ठिकाणी मंगळवारी केलेल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे या अर्जात म्हटले आहे.

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील सभेत ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असून, त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसा तक्रार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आला आहे.

राजू शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यातील हेरले या ठिकाणी मंगळवारी केलेल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे या अर्जात म्हटले आहे. ‘‘सीमेवर आमची पोरं जातात. कुणाल देशपांडे, कुलकर्णींची पोरं सीमेवर जात नाहीत,’’ अशा पद्धतीने ब्राह्मण समाजाची विनाकारण बदनामी करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. ब्राह्मण समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी लढत आला आहे. आजही समाजातील अनेक तरुण देशासाठी सैन्यात लढत आहेत. शहीददेखील झाले आहेत, असे असताना विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी शेट्टी यांनी हे वक्तव्य केले आहे. वास्तविक सीमेवार सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी जातात याचा शेट्टी यांना विसर पडला आहे, असेही या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे या भाषणाचा व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध असून, तो तपासून जातीयवादी वक्तव्याबद्दल, ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेट्टी हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अशा प्रकारे जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे. यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यांचा अवमान केल्याबद्दलत्यांच्यावर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सेवा संघाचे अध्यक्ष अंकित काणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे