दुर्गा वाहिनीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजिका ॲड. मृणालिणी पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय मंचर, कोविड केअर सेंटर अवसरी खुर्द या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे संकट आलेले आहे. अशा वेळी पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनता घरात असताना खऱ्या अर्थाने पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभाग कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी कोरोना काळात पुढे येऊन काम केले. नागरिकांची मदत केली, सेवा केली. या योद्ध्यांनी तहान-भूक, दिवस-रात्र न पाहता हे सर्वजण आपले कर्तव्य बजावत होते. या सर्वांसोबत रक्षाबंधन साजरी करणे ही एक वेगळीच बाब या निमित्ताने ठरली. या उत्सवावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दुर्गा वाहिनीचे या उपक्रमाचे विशेष कौतुक करून धन्यवाद दिले. मंचर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय मंचर तसेच कोविड केअर सेंटर अवसरीचे सर्व डॉक्टर्स, स्टाफ, कर्मचारी यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन दुर्गा वाहिनीच्या मनीषा चासकर, प्रगती चव्हाण, तनुजा पोखरकर, ऐश्वर्या वाबळे, मयुरी चासकर, वैष्णवी कदम, प्रीती शिंदे यांनी केले.
२५ मंचर राखी
मंचर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.