माऊलींच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रशालेतील उपक्रमांची माहिती देत बहीण-भावांच्या नात्यातील ऋणानुबंध व सामाजिक एकोपा, संस्कार याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रातिनिधिक स्वरुपात प्रशालेत उपस्थित विद्यार्थिनींनी आपल्या भावांना मास्क देऊन व औक्षण करून राख्या बांधल्या, भावांनी बहिणीला सॅनिटायझर देऊन त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली.
प्राचार्य दीपक मुंगसे यांनी आपल्या मनोगतात आपली संस्कृती जपत भावाने बहिणीचे रक्षण केले पाहिजे, असे सांगितले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा यांची माहिती सांगून भावा-बहिणीच्या नात्याचे महत्व सांगितले. स्त्रियांच्या सुरक्षेबाबत समाजाचे दायित्व विषद केले. तंत्रस्नेही शिक्षक वर्षा काळे, निशा कांबळे, चव्हाण राहुल यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.