रुग्णांच्या सेवेमध्ये दिवस-रात्र कार्यरत असून मागील ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये या सेंटरच्या माध्यमातून सुमारे दोनहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रक्षाबंधनाचा सण होता तरीसुद्धा डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पेशंट, समन्वयक, आचारी, स्वच्छतादूत या दवाखान्यात कार्यरत होते. या सर्वांना राखी बांधण्यात आली. विशेष म्हणजे, अतिदक्षता विभागात असणाऱ्या पेशंटला कांचन कुल यांनी स्वतः जाऊन राखी बांधली. यावेळी कोविड रुग्णांचे मनोरंजनासाठी सुभाष यादव यांचा कॉमेडी तडका व प्रेम कोतवाल यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या वेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, या कोविड सेंटरचे समन्वयक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, दिनेश गडधे, आबा चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आमदार राहुल कुल यांची कन्या मायराचा वाढदिवस रुग्णांसोबत कोविड सेंटरमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कुल कुटुंबीयांच्या वतीने रुग्णांना अन्नदान, औषधे व जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
२३ केडगाव रक्षाबंधन