लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या पुढाकाराने लिओ क्लब जुन्नर शिवनेरीतर्फे क्लबच्या अध्यक्षा डॉ. धनश्री गुंजाळ, सेक्रेटरी श्वेता शिंदे, खजिनदार डॉ. प्रिया जठार यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी भारतीय लष्कर सेवेतील निवृत्त सुभेदार मेजर उमेश पांडुरंग अवचट, भारतीय हवाईदल सेवेतून निवृत्त झालेले बाळासाहेब कुशाभाऊ मुळे, भारतीय नौदलातून निवृत्त झालेले राजेंद्र दशरथ अडसरे आणि भारतीय लष्कर सेवेत सध्या कुपवाह येथे कार्यरत असणारे ज्ञानेश्वर सुभाष खांडगे आदी उपस्थित होते
याप्रसंगी या वीर सैनिक अधिकाऱ्यांनी त्यांचे लष्करी सेवेतील प्रेरक अनुभव कथन केले. या वेळी जुन्नर तालुक्यातून १५० राख्या जम्मू-काश्मीरमधील कुपवाह या सीमारेषेवर जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवण्यासाठी जुन्नर तालुक्यातून १५० राख्या विद्यार्थिंनीकडून जमा करण्यात आल्या. यंदा रक्षाबंधनाच्या औचित्यावर या सर्व राख्या सीमेवरील जवानांपर्यंत सार्जन्ट ज्ञानेश्वर खांडगे यांच्या माध्यमातून पोहोच केल्या जाणार आहेत. सशस्त्र सेवेतील सैनिकांसाठी आभाराची भावना व्यक्त करणारी पत्रे यावेळी विद्यार्थ्यांनी लिहून पाठवली. याप्रसंगी लायन्स क्लबचे सदस्य नरेंद्र गोसावी दीपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, नवीन पटेल, योगेश जुन्नरकर, अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प समन्वयक जुईली गुंजाळ, श्रावणी शिंदे यांनी केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केतन जगताप, सर्वेश मांडे, काजल डोंगरे, अवधूत कोऱ्हाळे, यश जठार, शिवकुमार चव्हाण, साक्षी खैरे, मोनिका पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. केतन जगताप यांनी आभार मानले.
फोटो क्रमांक : १४ नारायणगाव राखी पौर्णिमा
फोटो :- लिओ क्लब जुन्नर शिवनेरीच्या वतीने आजी - माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
140821\img-20210812-wa0235.jpg
लिओ क्लब जुन्नर शिवनेरीच्या वतीने आजी - माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला .