पुणे : 1 जानेवारी 1848 राेजी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली हाेती. हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जाताे. आज समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीच्यावतीने भिडेवाडा ते फुलेवाडा अशी रॅली काढण्यात आली. सजवलेले रथ, लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात ही रॅली काढण्यात आली
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतीपथावर नेत आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी हा दिवस यंदा देखील ‘फुले दांपत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.
भिडेवाडा येथून निघालेल्या या भव्य रॅलीत कमलातई ढोले-पाटील, अश्विनी कदम, माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, रॅलीचे मुख्य संयोजक डि.के.माळी,महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विकास रासकर, मोहन जोशी, नगरसेवक मनीषा लडकत, गायत्री लडकत, संगीता देवलकर, संगीता अंतरे, देवयानी फरांदे, संदीप लडकत, मधुकर राऊत, सुधीर पैठणकर, शारदा लडकत, शैलाताई दुधाणे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
भिडेवाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडे आली. तिथून फुले वाड्यावर आलेल्या या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी गंजपेठ येथील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.