लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नित्यानंद रिहॅबिलिटेशन अँड रेसिडेन्शियल मेंटल हेल्थ केअर सेंटर, कात्रज तसेच पुणे शहर पोलीस व अँटी नार्कोटिक सेल यांनी जनजागृतीकरिता अमली पदार्थ व्यसनाविरोधात रॅली आयोजित केली होती.बालगंधर्व रंगमंदिरापासून डेक्कन मार्गे गुडलक चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीद्वारे व्यसनाधीनता/नशेच्या आहारी जाणे हा एक आजार आहे व त्यावर उपचार करणे आवश्यक असते. याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नित्यानंदचे संस्थापक व मेडिकल डायरेक्टर डॉ. नितीन दलाया म्हणाले, ‘‘नित्यानंदच्या पुनर्वसन केंद्रांमध्ये गेल्या ५-७ वर्षांमध्ये १४ ते १९ वयाच्या तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे. नित्यानंदमध्ये मानसोपचार व व्यसनमुक्तीकरिता दाखल होणाऱ्यांपैकी जवळपास ४५ टक्के प्रमाण हे व्यसनाधीन व्यक्तींचे असते. आपल्या जवळच्या माणसांमध्ये व्यसनाधीनता सुरू झाली असेल ते ओळखता येणे व त्यावर योग्य ते उपचार करणे आवश्यक असते.’’नित्यानंद रिहॅबिलिटेशन सेंटर हे पुण्यातील सर्वांत मोठे पुनर्वसन केंद्र असून, त्यांच्या दोन शाखा आहेत. कात्रज व हिंजवडीजवळील पाचाणे गावाच्या दोन्ही शाखांद्वारे मानसिक तसेच व्यसनमुक्तीकरिता निवासी उपचार केले जातात.रॅलीदरम्यान नित्यानंदच्या कर्मचारीवर्गाने तसेच हितचिंतकांनी घोषणा, पत्रके यांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच; पण पथनाट्याद्वारे लोकांना अमली पदार्थांच्या व्यसनांचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दर्शवले. उपक्रमात अँटी नार्कोटिक सेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरिक्षक स्वाती थोरात सुनील दारेगे व इतर पोलीस अधिकारीही सहभागी झाले.
व्यसनांविरोधात नित्यानंदतर्फे रॅली
By admin | Published: June 29, 2017 3:36 AM