शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:40 PM

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ठळक मुद्देराम कदम कलागौरव पुरस्काराचे हे १३ वे वर्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली माहिती

पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.राम कदम कलागौरव पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. यावर्षीपासून संगीत आणि कला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आला आहे. त्यानुसार, शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांची निवड केल्याचे खाबिया यांनी सांगितले. प्रतिष्ठानतर्फे पहिला पुरस्कार जगदीश खेबूडकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर भास्कर चंदावरकर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, सुरेश वाडकर, अरुण दाते, अनुराधा पौडवाल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :Shankar Mahadevanशंकर महादेवनSharad Pawarशरद पवारPuneपुणे